शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा द्या-संभाजी ब्रिगेड

अंबाजोगाई (प्रतिनिधी):शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम पीक विमा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांना सोमवार, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी जुन ते सप्टेंबर २०२३ या महिन्यांत अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे सरासरी उत्पादन ९०% पेक्षा ही कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला व्यापारी मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत. म्हणून यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. ४० पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. म्हणुन शासनाने शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा ८ दिवसांत द्यावा. तसेच शासनाने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पुढील सवलती द्याव्यात. १) सरसगट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे., २) शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा हजार रूपये हमी भाव द्यावा., ३) शेतकऱ्यांचे लाईट बील माफ करावे., ४) पी.एम.किसान सन्मान निधी योजनेतून केंद्र सरकारने दरमहा दहा हजार रूपये द्यावे., ५) ई-पिक पाहणी ही जाचक अट रद्द करावी., ६) दुष्काळी तालुक्यातील व्यावसायीक शिक्षण घेणाच्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. या सर्व मागण्या मान्य नाही केल्या तर या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी १) तहसिलदार, अंबाजोगाई., २) कृषि अधिकारी, ३) ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, तालुका प्रतिनिधी यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे, बीड जिल्हा सचिव नारायण मुळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते मारूती सरवदे, ऍड.प्रशांत शिंदे, पृथ्वीराज सोनवणे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे कपिल टेहरे आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Latest Articles