आपल्या शहरातील दुकानांमधूनच सणांसाठी खरेदी करावी- सेवकराम जाधव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-श्रीमंत असणारे बरेच जण बाहेरील मोठ्या शहरातून खरेदी करत असतात परंतु आपण ज्या शहरात राहतो त्याच शहरातून सणावारांची खरेदी व्हायला हवी. जेणेकरून गोरगरिबांसह सर्वांचाच सण गोड होईल. दिवाळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर कपडे, दाग दागिने, अनेक प्रकारच्या गृह सजावटीच्या वस्तू, दिवे, पणत्या, नवीन आस्थापनासाठी लागणारे साहित्य खरेदी आपल्याच शहरातून करायला पाहिजे. ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या सर्वच घटकांच्या

गरजा भागवण्यास मदत होईल.

आपणास घरकामगार, दुकान, छोटे मोठे उद्योग, कारखाने, आपले विविध व्यवसाय यासाठी लागणारे सर्व कामगार, आपणास निवडून येण्यासाठी लागणारे मतदार हे बाहेरचे नसून आपल्या शहरातीलच असतात. मग सणावाराची खरेदी आपण बाहेरून का म्हणून करावी..? आपला पैसा हा आपल्या येथील लोकांच्या कामी आला पाहिजे. हि आपली भावना का नसावी..? ज्या ज्या वेळी निसर्गाचा कोप होतो किंवा अपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी आजूबाजीची

माणसेच कामाला येत असतात, पैसा नाही.. त्याकरिता आजूबाजूची माणसं आनंदी राहिली पाहिजेत अशी आपली प्रत्येकाची कृती असावी. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles