शिदोड येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 55 जणांचे रक्तदान

बीड (प्रतिनिधी) – जिजाऊ मित्रमंडळ शिदोड यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी शिदोड गावातील महिला, पुरुष यांनी रक्तदान शिबीरा मध्ये सहभागी होऊन रक्तदान केले. रविवारी (दि. 10) रोजी श्री.महालक्ष्मी देवी मंदिर परिसरात झालेल्या शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री महालक्ष्मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शिदोड च्या वतीने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तरूणांना छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगून रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. रक्तदान शिबिरास शिदोड गावातील लोकांनी रक्तदान करून सहकार्य केले.

Related Articles

Latest Articles