कुणबी प्रमाणपत्र मदत कक्ष सुरू

बीड : जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र नागरिकांना सदर नोंदीच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीस अहवाल सादर करण्यासाठी बारा विभागांच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यात सर्व आली आहे. सदर तपासणीदरम्यान अभिलेख्यांमध्ये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत.

मदत व साहाय्य करण्यासाठी यांना करा कॉल

मराठी समाजातील पात्र नागरिकांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन मिळण्यासाठी कर्मचायांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गोविंद पेदेवाड मोबाईल क्रमांक ८३०८४५४३०५, अव्वल कारकुन सचिन बहिर मोबाइल क्रमांक ९४२२३९२२९४ व महसूल सहायक सूरज मुळे मोबाइल क्रमांक९५४५४७७९७९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

बीड तालुक्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. प्रमाणपत्र मिळविण्यात अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी सदरील मोबाइल नंबर दिले आहेत.

जिल्हाभरात आढळून आलेल्या कुणबी जातीचे नोंद असणारे वरील अभिलेखे तालुकानिहाय beed.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र नागरिकांना सदर नोंदीच्या आधारे

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी सुलभता निर्माण होणार आहे.

Related Articles

Latest Articles