स्वातंत्र्य दिना निमित्त आम आदमी पार्टी बीडमध्ये काढणार तिरंगा यात्रा

माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड (प्रतिनिधी):बीडमध्ये आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली व त्यामध्ये काही प्रस्ताव पास करण्यात आले की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने बीड शहरामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत व भव्य दिव्य अशी तिरंगा यात्रा बीड शहरांमधून काढण्यात येणार आहे असा निर्णय आम आदमी पार्टी बीड जिल्हा नियोजन बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळी 15 ऑगस्ट सकाळी आठ वाजता ध्वजारोहण पार्टी ऑफिस बीड येथे केला जाईल व स.10.30 तिरंगा यात्रेचे आयोजन प्रारंभ केला जाईल ही यात्रा बीड शहरातील तेलगाव नाका बार्शी नाका मोमीनपुरा चांदणी चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक माळवेस बलभीम चौक कारंजा बशीरगंज छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर रोड जिल्हा अधिकारी कार्यालय जुना नगर नाका भगवान बाबा चौक व राजीव गांधी चौक मराठवाडा मुक्ती संग्राम स्तंभ येथे यात्रेचे समापन होईल अशी या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला व सर्वांनी या यात्रा आनंदात उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडावी यासाठी सर्व जबाबदाऱ्या घेण्यात आल्या या यात्रा मध्ये मोटरसायकल्स चार चाकी वाहन ट्रॅक्टर देशभक्ती गीतामध्ये यात्रा काढण्यात येणार आहे तरी सर्व जनतेला नागरिकांना व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान आम आदमी पार्टी बीड करत आहे या बैठकीमध्ये माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटन मंत्री ज्ञानेश्वर जी राऊत जिल्हा सचिव रामधन जमले शहर अध्यक्ष सय्यद सादेक कोषाध्यक्ष कैलास चंद्रपालीवाल सामाजिक कार्यकर्त्या किसकींदाताई पांचाळ तालुका अध्यक्ष भीमराव कुठे उपाध्यक्ष आजम खान दादासाहेब सोनवणे पिंपळनेर सर्कल प्रमुख तालुका संघटनेच्या दत्ता सुरवसे रफिक पठाण अल्पसंख्याक अध्यक्ष बीड तालुका

Related Articles

Latest Articles