संभाजी ब्रिगेड परळी वै.प्रभारी तालुध्यक्षपदी पांडुरंग मोरे यांची निवड

 

पक्षाचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी काम करू – पांडुरंग मोरे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे,महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर,प्रदेश संघटक तथा बीड जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुदर्शन तारक सर, प्रदेश संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे सर, विभागीय अध्यक्ष ऍड.राहुलभैय्या वायकर, यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विश्वम्भर मोरे यांच्या उपस्थिती मध्ये दि.११ ऑगष्ट २०२३ रोजी परळी वै. संभाजी ब्रिगेड, प्रभारी तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग किशनराव मोरे यांची निवड करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व तसेच पक्षाचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी सदोदित काम करू असा विश्वास या निवडीच्या वेळी नवनियुक्त प्रभारी तालुकाध्यक्ष पांडुरंग मोरे यांनी दिला.
याप्रसंगी बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, परळी शहराध्यक्ष विश्वाम्भर मोरे, संभाजी ब्रिगेड सेलू (परळी) शाखा अध्यक्ष व्यंकटेश बदाले उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles