मंत्रिमंडळ विस्तारांसंबंधी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? वाचा बातमी

राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंबंधीही त्यांनी माहिती दिली.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ इत्यादी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच जलजीवन मिशनच्या अंतर्गत ज्या काही तक्रारी असतील त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये समन्वय नाही, हा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी, याच कारणाने या दोघांना माझ्याबरोबर घेऊन बसलो आहे, असं म्हणून यांचे वाद हे काहीच नाहीत, ही पेल्यातली भांडणं आहेत, असं सांगितलं.

जलजीवन मिशनच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना फडणवीस म्हणाले की, जलजीवन मिशन संदर्भामध्ये केंद्र सरकारने कधीही भेदभाव केलेला नाही, जो काही निधी आहे तो वितरित केलेला आहे ज्या वेळेला महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळेला याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासंदर्भात जर तक्रार कोणाच्या तक्रारी असतील तर निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Latest Articles