मुंबई इंडियन्सचा स्टार आकाश मधवालवर ‘या’ लीगमध्ये क्रिकेट खेळण्यास बंदी

वी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) एका खेळाडूची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने आपल्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले आहे.

या खेळाडूचे नाव आहे आकाश मधवाल (Akash Madhwal) . एलिमिनेटच्या महत्वाच्या सामन्यात या बॉलरने आपली जादू दाखवत मुंबईला एलिमिनेटच्या महत्वाच्या सामन्यात जिंकून देण्यात महत्वाची कामगिरी केली. त्याने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 3.3 ओव्हर्समध्ये 5 धावा देऊन लखनऊच्या 5 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये प्लेऑफच्या इतिहासात 5 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे आकाश मधवालने डेब्यु सीजनमध्ये ही कामगिरी केली आहे.

विश्वासाची करत आहे परतफेड
“रोहित भाई खेळाडूंना संधी देतात. ते प्लेयरवर विश्वास ठेवतात. त्याला पाठिंबा देतात. नव्या खेळाड़ूला संघातील त्याच्या स्थानाची चिंता असते. रोहित शर्माने (Rohit Sharma) ती भिती दूर केली आणि आकाश आज परफॉर्म करतोय” असं आशिष म्हणाला. “मुंबई इंडियन्सने आकाशवर 2022 मध्ये विश्वास टाकला. आकाश आता त्या विश्वासाची परतफेड करतोय” असे आशिष म्हणाला. आशिष हा आकाशचा भाऊ आहे.

स्थानिक लीगमध्ये खेळण्यास बंदी
“आकाश उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) टेनिस क्रिकेट खेळताना इतकी जबरदस्त गोलंदाजी करायचा की, त्याच्यावर स्थानिक लीगमध्ये (local league) खेळण्यावर बंदी घालण्यात आली” होती असे आशिष मधवाल म्हणाला. तो पेशाने बिझनेसमन आहे. “त्याच्या गोलंदाजीची दहशत होती. स्थानिक लीग क्रिकेटमध्ये त्याच्या खेळण्यावर बंदी होती. त्यामुळे आकाश रुरकीच्या बाहेर जाऊन खेळायचा” असे आशिष यावेळी म्हणाला.

आकाश मधवालची आयपीएलमधील कामगिरी
IPL 2023 मध्ये आकाश मधवालने 7 सामन्यात 13 विकेट घेतले आहेत. त्यामुळे आज गुजरात विरुद्ध होणाऱ्या क्वालिफायर 2 सामन्यामधील त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Related Articles

Latest Articles