दोन दिवसांपूर्वी फौजदार झाला अन् लाच घेताना रंगेहाथ पकडला, तर दुसऱ्या फौजदाराने…

त्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने राज्यातील ३८५ जणांना फौजदार केल्याचे आदेश मंगळवारी रात्री काढले. त्यात नाव असलेल्या सातारा ठाण्यातील पोलिस कर्मचारी मच्छिंद्र बापुराव ससाणे (५५, रा.

ग.नं.२, हनुमानगर, दत्ताचौक, गारखेडा) यास २४ हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. बुधवारी दिवसभर पुष्पगुच्छ स्वाकारणाऱ्या ससाणेच्या हातात गुरुवारी बेड्या पडल्या आहेत.

सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत मच्छिंद्र ससाणे याच्याकडे कौटुंबिक वादातुन दाखल ४९८ च्या गुन्ह्याचा तपास होता. या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी ससाणे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २४ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीचे निरीक्षक संदीप राजुपत, अंमलदार केवलसिंग घुसिंगे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रय होरकटे यांच्या पथकाने संताजी पोलिस चौकीजवळ सापळा लावला. तक्रारदाराकडून पैसे घेताना मच्छिंद्र ससाणे यास पथकाने रंगेहाथ पकडले. ज्या ठाण्यात बुधवारी दिवसभर पुष्पगुच स्विकारले, सर्वांनी अभिनंदन केले, त्याच ठाण्यात ससाणेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात केली.

अर्ज निकाली काढण्यासाठी मागितले २० हजार
सिडको पोलिस ठाण्यातील फौजदार नितीन दशरथ मोरे (४७) याने पोलिस ठाण्यात प्रापर्टीविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तडाजोडीत १२ हजार रुपयात व्यवहार ठरला. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक हणुमंत वारे, अंमलदार साईनाथ तोडकर, राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण यांच्या पथकाने सापळा लावला. सिडको ठाण्याच्या पाठीमागील साई रसवंतीमध्ये १२ हजार रुपये लाच घेताना पथकाने पकडले. विशेष म्हणजे मोरे हा सुद्धा चार महिन्यांपूर्वीच फौजदार झाला होता.

Related Articles

Latest Articles