बीड:सदगुरु श्री वामनराव पै निर्मिती जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बीड यांच्यावतीने हॉटेल ग्रँड यशोदा बीड येथे स्वानंद योग लेवल वन या कोर्सच्या आयोजन 18 जून रोजी आयोजित करण्यात आलेले होते. जीवन विद्येचे तत्वज्ञान जनमानसात अधिक लोकप्रिय होत चालले आहे. या कोर्स मध्ये तन मन आणि धन या विषयावर श्री दशरथ शिरसाट साहेब व श्री कृष्णा मस्कर साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शरीर साक्षात परमेश्वर कसा आहे शरीराचे प्रत्येक अवयव किती मोलाचे आहेत.आपल्या शरीराकडे पाहण्याची दृष्टी कशी पाहिजे. मन मन अंतर्मन व बहिर्मन हे मनाचे दोन भाग असून त्यांचे कार्य कसे चालते याबद्दल या शुभ रात्र मनाबद्दल सांगितले. मनाला आपल्या मनाप्रमाणे घडण्यासाठी काय केले पाहिजे याची युक्ती या शिबिरामध्ये सांगितली गेली. धन धन हे सर्वांना माहित आहे परंतु कोणत्या मार्गाने कमवले पाहिजे किती कमावले पाहिजे त्याचा वापर कसा केला पाहिजे याचे तत्त्वज्ञान या शिबिरात सांगितले गेले अशा विविध अंगाने या कोर्स मधून लोकांना जीवन विद्या तत्वज्ञानाची ओळख करून दिली. कोर्सच्या शेवटी कोर्स मधील लोकांनी कोर्स बद्दल मनोगत व्यक्त केले व असे कोर्स अजून लवकरात लवकर घ्यावेत अशी विनंती केली.
या कोर्सला सहकार्य करणारे बीड जवळील सर्व गावातील सरपंच , माजी सरपंच व कार्यकर्ते तसेच काही सामाजिक संघटना यांनी मदत केलेली आहे. जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र बीड यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.