भिवराज कोकणे यांना शक्ती प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

भिवराज कोकणे यांना शक्ती प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बीड:वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक भिवराज कोकणे यांनी आपल्या विविध शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापरातून, स्वतःच्या वेगळ्या अशा अध्यापन शैलीने, विविध शालेय उपक्रम, विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करणे , स्वतः शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून त्याचा अध्यापनात वापर करणे , विद्यार्थ्यांना बोलके करून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी त्यांचे असलेले योगदान,विद्यार्थ्यांसाठी राबावलेले शालेय व सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी करत असलेले प्रयत्न,त्यांनी केलेले सामाजिक कार्य याची शक्ती प्रतिष्ठानने दखल घेतली. शक्ती प्रतिष्ठान यांच्या पुरस्कार सोहळ्यात तहसीलदार सुहास हजारे, गटशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, सेवा निवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी, पत्रकार संजय मालानी,पत्रकार व्यंकटेश वैष्णव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय केंडे यांच्या शुभहस्ते भिवराज कोकणे यांना शक्ती प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी उजगरे साहेब, केंद्रप्रमुख धाईतिडक गणेश, मुख्याध्यापक कदम सर, मुख्याध्यापक डेंगे सर, कांबळे सर, रामदासी साहेब,केंडे मॅडम, स्वामी सर, खडकीकर सर,सर्व ग्रामस्थ मोरेवाडी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Latest Articles