नागापूर वाण धरणावरील धरणे आंदोलनाचे रूपांतर जल आंदोलनात

नागापूर वाण धरणावरील धरणे आंदोलनाचे रूपांतर जल आंदोलनात

शेकडो मराठा आंदोलक उतरले वाण धरणाच्या पाण्यात

परळी वैजनाथ – (प्रतिनिधी)
सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या धरणे आंदोलनाचे रूपांतर जल आंदोलनात झाले. मागण्या मान्य करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचे म्हणत शेकडो मराठा आंदोलक वाण धरणाच्या पाण्यात उतरले आणि आरक्षण आमच्या हक्काचं..व सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आंदोलकांना रोकण्या करिता पोलिसांना खूप मोठी कसरत करावी लागली असल्याचे पाहवयास मिळाले.

सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परळी तालुक्यातील समाज बांधव आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नागापूर येथील वाण धरणावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते त्याचे रूपांतर जल आंदोलनात झाले.

राज्य सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आंतरवली सराटी घटनेनंतर मराठा समाज बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत,घटनेस जवाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर खटले दाखल करावेत. आंदोलकांच्या या प्रमुख मागण्या असून त्या जर मान्य नाही केल्या गेल्या तर जल आंदोलनाचे रूपांतर जलसमाधी आंदोलनात होईल अश्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Latest Articles