अमोल राडकर पाटील यांनी भारत राष्ट्र समिती ( BRS ) च्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

 

अमोल राडकर पाटील यांनी भारत राष्ट्र समिती ( BRS ) च्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाचे सदस्यत्व न स्वीकारता फक्त समाजकार्य करेल – अमोल राडकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील कौडगाव (हुडा) फाटा येथे मराठा आरक्षण मिळावे या मागणी करिता आंदोलन करण्यात आले होते. याप्रसंगी अमोल राडकर यांनी बीआरएस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणार नाही.येणाऱ्या पुढील कालखंडात फक्त सामाजिक व शेतकरी चळवळीच्या कार्यात स्वतःला व्यस्त करून घेईल असा राडकर यांनी संकल्प केला.
जालना जिल्ह्यातील अनंतरवली येथे लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला.त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून अमोल राडकर यांनी राजीनामा देत असल्याचे व इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

Latest Articles