शिवसेना पक्षश्रेष्ठींचे फोटो,नाव,वापरून आप्पासाहेब जाधव यांनी कार्यक्रम घेऊ नये

शिवसेना पक्षश्रेष्ठींचे फोटो,नाव,वापरून आप्पासाहेब जाधव यांनी कार्यक्रम घेऊ नये                                            शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांची पत्रकाद्वारे माहिती                                                                              बीड प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आप्पासाहेब जाधव यांची शिवसेना पक्षातून काही दिवसापूर्वी हकालपट्टी केलेली आहे तरी इथून पुढे आप्पासाहेब जाधव यांचा शिवसेना पक्ष, संघटना तथा शिवसैनिकांचा कसलाही संबंध नसून आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींचा फोटो व नावे वापरून कुठलाही कार्यक्रम घेऊ नये असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी पत्रक काढून प्रसार माध्यमांद्वारे कळवले आहे

Related Articles

Latest Articles