कालच्या सभेने बीड करांना काय दिलं केळ वाटून आंदोलन केलं

माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
___________________________
बीड आम आदमी पार्टीच्या वतीने काल झालेल्या सभेमध्ये लाखो करोडो रुपये खर्च करून बीडकरांना काय भेटले अशा प्रश्न विचारत आम आदमी पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केळ वाटप करून शासनाला प्रशासनाला व महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषी मंत्री धनंजय जी मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन करून बीडमध्ये जो सभेचे आयोजन केलं त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल अशी अपेक्षा होती रेल्वेचा प्रश्न होता पाठीमागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला नाही दुष्काळाची परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये एवढं करोडो रुपये खर्च करून शासकीय यंत्रणेचा दूर उपयोग करून शक्तिप्रदर्शन केलं यांच्याकडून बीडकरांना व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी कृषी पंपांसाठी विद्युत पुरवठा मोफत बीड जिल्ह्याचा प्रलंबित असलेला रेल्वे प्रकल्प मराठवाड्याची वाटर योजना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असे खूप असे प्रश्न प्रलंबित असताना सर्व जनतेला प्रश्न पडला होता की बीडकरांना कालच्या सभेने दिले काय म्हणून आम आदमी पार्टीने त्याचा निषद नोंदवत जनतेला केळ वाटप केली तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीडकरणा काय तर केळ दिलं आंदोलनामध्ये माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी. रामधन जमाले सचिव,सामाजिक कार्यकर्त्या किसकींदाताई पांचाळ, सय्यद सादिक शहराध्यक्ष, भीमराव कुंटे दादासाहेब सोनवणे सर्कल प्रमुख शिवकन्या कागदे, दत्ता सुरवसे, आजम खान, व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Latest Articles