सुप्रसिद्ध डॉ.सुरेशचंद्र चौधरी यांच्यावर झालेला हल्ला संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही

सुप्रसिद्ध डॉ.सुरेशचंद्र चौधरी यांच्यावर झालेला हल्ला संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही

भ्याड हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे – सेवकराम जाधव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):येथील थोर विचारवंत समाजसेवक तथा सुप्रसिद्ध डॉ. सुरेशचंद्र चौधरी यांच्यावर काही माथेफिरुंनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील तसेच गाव भागातील गोरगरिबांचा कैवारी डॉक्टर, शंभर रुपयात दुरुस्त करणारे डॉक्टर, पैसे नसतील तरी रुग्णांवर इलाज करणारे डॉक्टर, “रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” समजणारे डॉक्टर म्हणून डॉ. चौधरी यांची सर्वदूर ख्याती आहे.
ज्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये अहोरात्र आपल्या दवाखान्याचे दरवाजे रुग्णांसाठी उघडे ठेऊन अत्यल्प खर्चामध्ये इलाज केला आहे. ज्यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत नशेच्या आहारी गेलेले अनेक लोक नशा मुक्त झाले आहेत.
आशा समाजाभिमुख काम करणाऱ्या विद्वान डॉक्टरवर विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला डॉक्टरवर नसून तो सत्त्यावर आहे.

 

असे भ्याड हल्ले संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नसून संबंधित हल्लेखोरास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे मत संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

Related Articles

Latest Articles