माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बीडमध्ये संडास बाथरूम मध्ये ठेवलेली भाजी विक्री ते विकतात हा व्हिडिओ समोर आल्यापासून देखील व्यापाऱ्यांना का देण्यात आली नाही.
बीड -बीड परिषदेचा अजब गजब कारभार बीड येथे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स लाखो करोडो रुपये खर्च करून भाजी विक्रीत्यांसाठी भाजी मंडई बांधण्यात आली परंतु कित्येक वर्षापासून बांधून ठेवलेली ही कचराकुंडी झालेली आहे यामध्ये ना शेतकऱ्यांना फायदा ना व्यापाऱ्यांना वापरण्यासाठी ही फक्त सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये टुकार दारुडे व नशेडी लोकांचा अड्डा बनलेली आहे यामध्ये मोकाट जनावरे येथील घाण कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येत आहे याविषयी नगरपरिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून आंदोलने करून ही का व्यापाऱ्यांना वापरण्यासाठी दिली जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे याची तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री व नगर विकास मंत्र्यांना करणार आणि यामध्ये दोषी असलेले विकास पुरुष अधिकारी यांच्यावर कारवाई का होत नाही हे विचारणा करणार आहे आज या भागामध्ये गेले असता येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या रोगराई पसरू शकतात याला कारणीभूत कोण हे विचारणा करणार आहे आत्ता मुख्य अधिकारी मा .नीता अंधारे मॅडम या विषयावर कित्येकदा चर्चा केली असता त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिलेली आहेत त्या उत्तरांना देखील बराच काळ उलटून झाला आहे तरी त्यावरती कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही लवकरच एक प्रतिनिधी मंडळ जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून यावरती कारवाई करण्यास भाग पडणार आहे .
यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी जिल्हा सचिव रामधन जमले शहर अध्यक्ष सय्यद सादेक तालुका उपाध्यक्ष आजम खान शहर सचिव मिलिंद पाळणे व येथील नागरिक उपस्थित होते