धारूर ते आडस रस्ता तात्काळ व्हावा याकरिता संभाजी ब्रिगेड ने केले रस्ता रोको आंदोलन.

धारूर(ॲड.युवराज फुन्ने): किल्ले धारूर ते आडस या मार्गावरील रस्ता अतिशय खराब झालेला आहे या मार्गावरुन प्रवास करत असताना प्रवाशांच्या अंगावर काटा येत आहे. हा मार्ग खुप मोठा रहदारीचा असल्यामुळे याच मार्गावरून विद्यार्थी -शेतकरी- वयोवृद्ध नागरिक यांचे अतोनात हाल होताना पाहायला मिळत आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढल्याने संभाजी ब्रिगेड च्या वतीने सा बां विभाग किल्ले व तहसील कार्यालयास रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संभाजी ब्रिगेड ने आज किल्ले धारूर येथे रास्ता रोको आंदोलन केले.

ko

या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड धारूर ते आडस,आडस ते उंदरी, आडस ते दिंद्रूड या मार्गावरील रस्ता तात्काळ व्हावा याची मागणी करून, दोन वर्षांमध्ये भरण्यात आलेल्या खडड्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाला केली,या मागण्या तात्काळ पुर्ण झाल्या नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष प्रविण ठोंबरे व संभाजी ब्रिगेड चे धारूर तालुका अध्यक्ष रमेश मोरे यांनी केली आहे.
या आंदोलनला शिवसेनेचे(उबाठा) धारूर ता.प्रमुख नागेश भाऊ शिनगारे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.
आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष प्रविण ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे धारूर तालुकाअध्यक्ष रमेश मोरे , सामाजिक कामात अग्रेसर असणारे सुर्यकांत जगताप, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.अश्विनी यादव, सारिका जोगदंड, ज्योती अंबाड, सविता जगताप,उषा जगताप यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून या रस्त्याच्या व्यथा मांडल्या.
या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मिसाळ, दुर्गेश जाधव (जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया) सिद्धराम यादव( संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष अंबाजोगाई), संभाजी ब्रिगेड ता.उपाध्यक्ष दत्तात्र गंगणे राजेंद्र मोरे (संभाजी ब्रिगेड ता.उपाध्यक्ष किल्ले धारूर) कृषी उत्पन्न बाजार समिती धारूरचे संचालक आडत व्यापारी संदीप भैया शिनगारे,कबीर इलेक्ट्रिकलस् चे चालक मालक इंजि.जनक फुन्ने, कुलदीप जगताप,विद्यार्थी आघाडीचे गोकूळ म्हेत्रे,सतिश कुंडकर,केशव टेहरे तर राकेश मोरे, अंगद कोथिंबीरे,रूद्रा गवळी,विनोद शेरकर,आकाश वाघमारे,अविनाश जाधव , समाधान मोरे नितीन राठोड,रोहन कुलकर्णी, आकाश थोरात, गणेश सौंदर, रामदास सोगे, अशोक साखरे , उत्तम जाधव, विनोद शेरकर , दिग्विजय आरे , नारायण मोरे, स्वराज आरे, ओमकार मोरे सह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रस्ता रोखो प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles