न.प. मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम यांना आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

न.प. मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम यांना आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा:माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बार्शी नाका मोमीनपुरा या भागातील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा गटार योजनेमध्ये गटार खाणारा वर कारवाई कधी करणार:सय्यद सादेक शहर अध्यक्ष 

 

बीड :आम आदमी पार्टीच्या निदर्शनात आले की बीड शहरातील गटार योजना ही फसवी ठरलेली आहे या योजनेमुळे शहरातील बऱ्याच रस्त्यांचे खोदकाम करून अस्तव्यस्त अर्धवट सोडून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करत आहे अशा फसव्या योजने च्या नावावर बीड शहरातील नागरिकांचे करोडो रुपये ज्यांनी गटारात घातले याची चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करावी व बार्शी नाका मोमीनपुरा या भागात रस्त्याचे काम पाठीमागील चार वर्षापासून विकासाच्या नावावर खांदून ठेवण्यात आलेले आहे गटार योजनेचे उघडे पडलेले गटारे नालीचं पाणी रस्त्यावर येत असलेलं यामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात धरून रस्त्याने वागाव लागत आहे घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे हे कामे ज्या कंपनीला दिलेली आहेत व वेळेवर पूर्ण केले नाही अशा कंट्रक्शन कंपनीला कळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून नागरिकांचे गमन केलेले पैसे वसूल करण्यात यावेत या सर्व अवस्थेला सर्वस्वी जबाबदार ही नगरपालिका असून हे अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करावी अन्यथा आम आदमी पार्टी येथील सर्व नागरिकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयावर मोर्चा काढणार असे निवेदन माननीय नीता अंधारे मुख्य अधिकारी नगरपरिषद यांना देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव रामधन जमले सय्यद सादेक शहराध्यक्ष भीमराव कुठे तालुका अध्यक्ष आजम खान तालुका उपाध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष प्रवीण पवार युवक संघटन मंत्री इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Latest Articles