लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थित रहा मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

बीडः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे  स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आजच्या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अँड.मंगेश पोकळे,बी.बी.जाधव,डॉ.प्रमोद शिंदे,अजित वरपे,भास्कर गायकवाड यांनी केले.

स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त आज बीडमध्ये मेटे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रम शिवसंग्राम परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला राज्यभरातून मंत्री,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.मराठा समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणारे आणि आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचे कार्य समाजासाठी मोठे राहिलेले आहे.

त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त आज जो अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे,त्याठिकाणी (दि.३०) दुपारी 2:00 वाजता आदरांजली वाहण्यासाठी स्मृती स्थळी कॅनॉल रोड,बीड येथे उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अँड.मंगेश पोकळे,बी.बी.जाधव,डॉ.प्रमोद शिंदे,अजित वरपे,भास्कर गायकवाड यांनी केले.

Related Articles

Latest Articles