मराठा वनवास यात्रे ला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

मुंबई : दिनांक १९ जून २०२३ मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी  तुळजापूर ते मंत्रालय (मुंबई आझाद मैदान) पर्यंत आयोजित केलेली ‘मराठा वनवास यात्रे’ चे आयोजक/ संयोजक यांची आज सोमवार दिनांक १९ जून २०२३ रोजी संभाजी ब्रिगेड पक्षाचे मुंबई अध्यक्ष सुहाजी राणे यांनी आझाद मैदानात जाऊन प्रत्यक्षात भेट घेतली. त्यांच्याशी आरक्षणा संदर्भात चर्चा केली. मत जाणून घेतले. त्यांना मराठा आरक्षणा संदर्भात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड पक्षाची भूमिका समजावून सांगितली आणि लेखी निवेदन देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाचा जाहीर पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर त्यांच्या तब्बेतीची आणि जेवणाच्या सोयीबाबत काळजीपूर्वक विचारपूस  केली.

दिनांक ६ मे २०२३ पासून ते आजपर्यंत ‘मराठा वनवास यात्रे’ला संपूर्ण ४४ दिवस झाले आहेत. त्यांमधील १२ दिवसापासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू आहे. तरी या निगरगट्ट शिंदे- फडणवीस सरकारने अद्याप आंदोलनकर्त्यांची दखल घेतलेली नाही. सरकारचा कोणीही प्रतिनिधी या ‘मराठा वनवास यात्रे’ च्या आयोजकांना भेटलेला नाही. त्यांच्याशी चर्चा केलेली नाही.
जोपर्यंत  मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करून ५०% च्या आतील ओबीसी मधुनच मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत नाही; तसा अधिकृत शासन जीआर काढत नाही तोपर्यंत आझाद मैदानात ठिय्या मांडून राहणार अशी ‘मराठा वनवास यात्रे’च्या आयोजकांचे ठाम मत आहे / मागणी आहे. या मागणीला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत असे सुहास राणे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले आहे.

Related Articles

Latest Articles