बीड:छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती वरवटी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्धाकृती मूर्तीची प्रतिष्ठापणा उत्साही वातावरणात करण्यात आली. यावर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने वरवटी येथे विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये भव्य आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. दत्ता जोगदंड स्री रोगतज्ञ, डॉ. अंशुमन बहीर अस्थिरोग तज्ञ, डॉ. पंकज घोडके या डॉक्टरांनी २०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच २१ तरुणांनी रक्तदान करून समाजात एक चांगला संदेश दिला. सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रा.पंजाबराव येडे यांचे व्याख्यान पार पडले.
सदरील कार्यक्रमाच्या शिल्लक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्धाकृती मूर्ती बनवण्याचा निर्णय समितीच्या वतीने घेण्यात आला व एक महिन्यानंतर 18.6.2023रोजी सकाळी9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथून वरवटीपर्यंत मुर्त्याची मिरवणूक वाजत गाजत मारुतीच्या मंदिरासमोर आली छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा गावकऱ्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.