आळंदी येथील वारक-यांवर लाठीहल्ला प्रकरणात चौकशी व पालखी मुक्कामी मुलभूत सुविधांसाठी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी दिंडी:- डॉ.गणेश ढवळे

बीड–पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान आळंदी येथे वारक-यांवर लाठीहल्ला प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच आषाढी वारीनिमित्त वारक-यांना पालखी मुक्कामी गावात निवा-याची सोय,पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालये आदिं मुलभूत सुविधांची सोय व्हावी तसेच पालखीमार्ग पैठण-पंढरपुर तसेच खामगाव पंढरपूर यांची दुरावस्था असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भेगाळलेले व रखडलेले राष्ट्रीय महामार्ग प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१९जुन सोमवार रोजी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय ज्ञानोबा-तुकाराम माऊलींचा जयघोष करत पालखीसह पायी दिंडी काढण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले.यावेळी दिंडीत भगवान मोरे, दामोदर थोरात,बाळकृष्ण थोरात,श्रीहरी निर्मळ, रामचंद्र मुळे, अँड.गणेश वाणी, महादेव कुदळे, शेख युनुस, बलभीम उबाळे , मिलिंद सरपते, रामनाथ खोड,अशोक येडे, रमेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, तुळशीराम पवार ,बाबा गायकवाड, संभाजी कोटुळे, संजय पावले, धनंजय सानप , राहुल थिटे, संजय जायभाये, दिपक बांगर,वनवे कालिदास,सानप अशोक, प्रदिप नेवळे,आंधळे मच्छिंद्र आदि सहभागी होते .

सरकारचे हिंदुत्व बेगडी:-जिल्हाध्यक्ष अशोक येडे                आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी सरकारचे हिंदुत्व केवळ बेगडी असुन मतदानासाठी आहे अन्यथा वारकरी संप्रदायावर लाठीहल्ला करण्या-यांना पाठीशी घालत असुन याचे परीणाम सरकारला भोगावे लागतील आम आदमी पार्टी या हल्ल्याचा तिव्र निषेध करत आहे.दिंडीत आपचे बीड जिल्हा सचिव रामधन
रामधन जमाले,प्रदिप अवसरमल, दादासाहेब सोनवणे, रामेश्वर गव्हाणे,विक्रम नागरगोजे, रामभाऊ शेरकर सहभागी होते.

आळंदी येथील वारक-यांवर लाठीहल्ला प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी

पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून वारकरी संप्रदाय पायी दिंडी करून जात आहे. शेकडो वर्षांपासून न्याय,समता,बंधुता,संयम, शांतता आणि सहिष्णुतेची शिकवण देणा-या वारक-यांवर आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान झालेला लाठीहल्ला निषेधार्ह असुन पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वारक-यांवर लाठीहल्ला होणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना काळीमा फासण्यासारखे असुन या प्रकरणाला जबाबदार कोण?? पोलिस प्रशासन आहे की तिथली व्यवस्था याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी

पालखी मुक्कामी वारक-यांना मुलभूत सुविधांची उपाययोजना करण्यात यावी.
—-
पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने पायी दिंडी वारक-यांना ऊन,वारा, पाऊस आदिंचा सामना करावा लागत असुन त्यांना पालखी मुक्कामी प्रशासनाकडून निवा-याची सोय, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालये व सुरक्षा आदिंची सोय करावी.

पालखीमार्ग रखडलेले असुन दर्जेदार पुर्ण करण्यात यावेत

बीड जिल्ह्यातून जाणारे पैठण ते पंढरपुर आणि खामगाव ते पंढरपूर रखडलेले असुन निकृष्ट कामामुळे जागोजागी भेगा पडलेल्या असुन दुचाकी वाहनांचे चाक अडकून अपघातांचे प्रमाण वाढले असून आवश्यक उपाययोजना करण्यात यावी.

Related Articles

Latest Articles