शिवाजी नगर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक व पोलिस कर्मचारी यांना लाच घेताना एसीबीने पकडले बीड- शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलीस कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.ही कारवाई बीड एसीबीनी केली.काही महिन्यांपूर्वीच याच पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यानंतर पुन्हा ही कारवाई झाली असल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील लाचखोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

