माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर.

गेल्या 50 वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतल्या शिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालु राहील सध्या सुरु असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल. माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही, जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

Related Articles

Latest Articles