ads

मराठा सेवा संघाच्या विभागीय अध्यक्षपदी शिवश्री अशोक ठाकरे यांची निवड

छत्रपती संभाजी नगर: येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या बैठकीत मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाअध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन त्यांची मराठा सेवा संघाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि .विजय घोगरे ,मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव निर्मलकुमार देशमुख,मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या प्रमुख  उपस्थितीत ही निवड करण्यात आली .यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी उपस्थित मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Latest Articles