शिवसंग्राम आक्रमक
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी शिवसंग्रामचे हजारो मावळे धरणे आंदोलनात सहभागी
बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग व बेरोजगार तरुण मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या वतीने लोकनेते स्व. विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेरणेतून दि. ८ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी शिवसंग्रामचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्या पेक्षा अधिक कालावधी लोटला मात्र जिल्ह्यामध्ये आणखीनही दमदार पाऊस झाला नाही उशिराने झालेल्या जेमतेम पावसामध्ये शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या केल्या मात्र कमी पावसामुळे पिकांच्या वाढी खुंटल्या आणि पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत आता शेतकऱ्याच्या पदरात पीक पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने धरणे आंदोलनात करण्यात आली आहे.
यावेळी मुग, सोयाबीन, उडीद, सह कापुस, तुर, बाजरी इ. पिकांना संपूर्ण जिल्ह्यात वगळलेल्या सर्व मंडळामध्ये पिकविमा अग्रिम २५% मंजूर करावा. मजुराच्या व शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावेत, पाणी टंचाईच्या बाबत उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांच्या व शेत मजुराच्या पाल्याचे चालू शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांची कर्ज वसुली तात्काळ थांबवावी व कर्ज माफ करावे, वीज बिल वसुली थांबवावी व शेती पंपाचे विजबिलही माफ करावे, शेती पंपास दिवसा विद्युत पुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी चारा छावणी चालू कराव्यात. बीड शहरातील पाणीपुरवठा नियमित करावा. या मागण्या धरणे आंदोलना वेळी करण्यात आल्या.
शिवसंग्रामच्यावतीने जिल्हाधिकारी बीड यांना संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीची निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण काशीद ज्येष्ठ नेते लक्षमण ढवळे, उपजिल्हाध्यक्ष रामदास नाईकवाडे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे सुनील अडसूळ सुहास पाटील, ऍड राहुल मस्के, नवनाथ प्रभाळे माऊली शिंदे,धनेश गोरे, कैलास माने,प्रा.सुभाष जाधव, मनोज जाधव,सचिन कोठुळे, मनीषाताई कोकाटे, ऍड. मनीषाताई कुपकर,साक्षीताई हांगे, सुनील शिंदे, फिरोज पठाण, अक्षय माने, शेख अबेद, श्रीहरी दोडके फौजी,राजेंद्र आमटे, प्रा. पंडित शेंडगे,प्रशांत डोरले,साधनाताई दातखिळ,पंडित माने, शेषेराव तांबे,बाळासाहेब हावळे, बाळासाहेब जटाळ, विनोद कवडे,मुकुंद गोरे,हनुमंत पवार,राजेंद्र माने, पांडुरंग आवारे पा. शेख कुतुब भाई, ज्ञानेश पानसंबळ,नामदेव धांडे, शिवराम राऊत, ज्ञानेश्वर कोकाटे, माऊली परजणे, बंडू बापू शहाणे,राजेश घुंगरड, गोपीनाथ बापू घुमरे, सिताराम घुमरे, नवनाथ काशीद,ऍड.गणेश मोरे, गणेश साबळे, सचिन जाधव, योगेश नाना शेळके, सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे,श्रीराम घोडके,अशोक जगताप, चंद्रकांत देवकर,शिवराम शिरगिरे, सातीराम ढोले, शेख अखिल भाई, अमजद पठाण, शेख अझहर भाई, सय्यद सलमान अली, बी एस कदम, महादेव कानडे, परमेश्वर सातपुते, शैलेश सुरवसे, विश्वास बहिरवाळ पा. सुनील कुटे,हरीश शिंदे, महादेव बागलाने,शहादेव काकडे, रेवनाथ घाटूळ, नानासाहेब कडबाने, अविनाश रंधवे, श्रीराम घोलप, आकाश कदम, पांडुरंग बहिर, बंडू शिंदे, बाबुराव मोरे, दादा भांबे, पोपटराव उबाळे, महेंद्र काटकर, हरिश्चंद्र ठोसर यांच्यासह हजारो शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शिवसंग्रामच्या आंदोलनाला यांनी दिला पाठिंबा
शिवसंग्राम च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनात विविध पक्ष, संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी, वकील यांनी पाठिंबा दिला. यात राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष किशोर पिंगळे, प्रा. गोपाळ धांडे, अशोक लोढा, दादासाहेब मुंढे, पंडित तुपे, ऍड. विवेकानंद सानप ऍड. गायकवाड यांची उपस्थिती होती.