अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भानकवाडीतील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेशी जुळूत असलेली तरुणाई उद्याच्या विजयाची पायाभरणी ठरणार- अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी -शिवसेना उबाठा गटाला जिल्ह्यात नवी उभारी देण्यासाठी बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप ताकदीनीशी कामाला लागले आहेत. येत्या काही महिन्यांमध्येच आता निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेची ताकद वाढवून जिल्ह्याभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी अनिलदादा जगताप यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरु केले आहे. अनिलदादांची शिवसेनेवर 37 वर्षांपासून असलेली निष्ठा आणि कार्यपद्धती पाहून तरुणाई मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.
दि. 27 सप्टेंबर रोजी बीड शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बीड विधानसभेतील भानकवाडी ता. शिरूर. जि. बीड येथील असंख्य युवकांनी एकत्रित येऊन अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. दादासाहेब आरेकर, ईश्वर आरेकर, संदीप आरेकर, सचिन माने, विष्णू रसाळ, भाऊसाहेब आरेकर, गोरख रसाळ, पवन सस्ते, पवन आरेकर, अर्जुन माने, संदेश आरेकर, कृष्णा पानसरे, बाबासाहेब रसाळ, रामहरी अरेकर आणि अनिल आरेकर यांच्या सहित असंख्य युवकांचा अनिलदादा जगताप यांनी बीड शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुछ देऊन स्वागत सत्कार केला.
जिल्ह्याभरातून विविध तालुक्यातून तरुण कार्यकर्ते अनिलदादांच्या पाठीशी उभारत असून जिल्ह्याभरात पुन्हा एकदा नव्याने शिवसेना उबाठा बळकट सशक्त होताना दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर जुळूत असलेली तरुणाई उद्याच्या विजयाची पायाभरणी ठरणार असल्याचे मत याप्रसंगी अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केले. दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या असंख्य युवकांनी अनिलदादा यांचे आभार मानले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्याबरोबर बीड शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
——————–