गंगामसला महसूल मंडळाला 25 टक्केअग्रीम द्या.भाई ऍड.नारायण गोलेपाटील

गंगामसला महसूल मंडळाला 25 टक्केअग्रीम द्या.भाई ऍड.नारायण गोलेपाटील

माजलगाव प्रतिनिधी तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला असुन गंगामसला महसूल मंडळात पिके नेस्तनाबूत होत असताना पिकविम्याच्या २५टक्केअग्रीमसाठी गंगामसला महसूल मंडळ वगळले आहे.महसुल मंडळाला २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करावा अशी मागणी भाई ऍड.नारायण गोलेपाटील यांनी माजलगाव तहसिलदार यांच्याकडे दि.२२ मंगळवार रोजी निवेदनाद्वारे केली आली आहे.

गंगामसला महसूल मंडळात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस न होऊन देखील व पिके नेस्तनाबूत होत असताना पिकविम्याच्या अग्रीमसाठी गंगामसला महसूल मंडळ वगळले आहे,ही बाब अत्यंत चुकीची असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. करीता गंगामसला महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस न पडल्याने २५ टक्के अग्रीम साठी समावेश करण्यात यावा यासह गंगामसला महसूल मंडळाला २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करण्यात यावा,२५ टक्के अग्रीमसाठी २१ दिवसाची अट रद्द करून पावसाचा १५ दिवसाचा खंड ग्राहय धरण्यात यावा,अति वृष्ठीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळधिकारी, यांनी सज्जावर हजर राहवे,गाव निहाय पर्जन्यमापक बसवण्यात यावे,सन २०२२-२०२३ चार राहिलेला विमा तात्काळ देण्यात यावा इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे माजलगाव तहसिलदार यांना करण्यात आल्या आहेत.
अन्यथा दि. २५ आॅगस्ट शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्ग ६१ मोठेवाडी फाटा छोटेवाडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे भाई अॅड.नारायण गोले पाटील, सुदर्शन हिवरकर, भगवान पवार, अॅड.पांडुरंग गोंडे, प्रभाकर खेत्री, अशोक रासवे, परमेश्वर खेत्री,सतिश रिंगणे, गजानन गोंडे,भाई मुंजा पांचाळ, हनुमान पांचाळ, सचिन पांचाळ आदींनी दिला आहे.

Related Articles

Latest Articles