बालाघाट हाफ मॅरेथॉन ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे थाटात उद्घाटन

बालाघाट हाफ मॅरेथॉन ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे थाटात उद्घाटन
29 ऑक्टोबरला होणार स्पर्धा; तयारीने घेतला वेग
बीड ःबीड येथील योगा ग्रुपच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या बालाघाट हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. गतवर्षीच्या प्रतिसादानंतर आता यावर्षीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याच्या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी करण्यात आले.

बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे सोमवारी सायंकाळी योगा ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाफ मॅरेथॉनच्या नोंदणी पोर्टलचे उद्घाटन कुटे ग्रुपचे उमेश कुलकर्णी, पोपटराव रांजवण, रवि खरसाडे, शंकर मोहिते, नवीद भाई, मनोज अग्रवाल, सी.ए. बी.बी. जाधव, राजुनाना पिंगळे, योगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत माने यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी योगा ग्रुपच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनिल थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी योगा ग्रुपच्या आजवरच्या वाटचालीबाबत माहिती देत योगा ग्रुपचे सदस्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये करत असलेल्या चमकदार कामगिरीबद्दल माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनीही सध्याच्या धकाधकीच्या काळात युवा व प्रौढांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यामध्ये सातत्य रहावे यासाठी योगा ग्रुपच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. बीड शहरातून सुरु झालेल्या या ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आरोग्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. बालाघाट हाफ मॅरेथॉनसाठी तिरुमला ऑईलचे विशेष सहकार्य लाभत असल्याचेही यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगा ग्रुपचे सदस्य कल्याण कुलकर्णी यांनी केले. यावेळी अनिल थोरात, विशाल सुस्कर, कल्याण कुलकर्णी, सुदर्शन हेरकर, राजू माने, गणेश वाघ, संदीप येवले, प्रशांत पौळ, ज्ञानेश्वर राऊत, लक्ष्मीकांत महाजन, दीपक ससाणे, सुहास देशपांडे, प्रकाश दामा, गणेश मैड, बंडू आगलावे, राजू पिंगळे , कल्याण औटे, सचिन सुस्कर, जितेंद्र भालेकर, प्रशांत माने, राजू नागरगोजे, धीरज कटारिया, सचिन कुलकर्णी, सुभाष हुंबे, दत्ता साळुंके, राजू विघ्ने, बाळासाहेब महाकुंडे, विवेक सोमवंशी, सुदर्शन शिंदे, राज मुंदडा , शरद खिल्लारे, संदीप रेवनवार, सचिन रेवनवार, जगदीश पडुळे, गणेश नवले , किरण कोळेकर, नितीन आघाव, महेश तांदळे, संदीप मानुरे, भानुदास जाधव, संतोष मोराळे , संतोष भोकरे, जालिंदर बेदरे, शंकर पवळ, तुकाराम वायभट, दीपक शेटे, राम सालगुडे, संजय पवळ, ज्ञानेश्वर भोईटे, बाळासाहेब कांबळे, हरी ठोंबरे, प्रदीप जगताप, विश्वास गवते, वैभव क्षिरसागर, सुदाम खोसरे, अनंत सांगळे, कुलदीप शहाणे, जयलाल राजपूत आदि उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नितीन अघाव यांनी मानले.
——-

Related Articles

Latest Articles