ओमकार उबाळे यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

बीड:महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी बीड जिल्हा परिषद येथे कार्यरत असणारे ओमकार बळीराम उबाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक १२/०८/२०२३ छत्रपती संभाजी नगर रोजी झालेल्या आमसभेत श्री. उबाळे यांची महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे मानद राज्यअध्यक्ष एन एन ठाकूर साहेब व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस माननीय महाळनकर साहेब व नूतन राज्यअध्यक्ष ताहेर देशमुख साहेब व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

यावेळी १६ जिल्ह्यातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासह बीड जिल्ह्यातील माझे सहकारी रुपेश कोकीळ,अशोक वाघमोडे,तालुकाध्यक्ष अरविंद दुबाले,आंधळे साहेब, श्री कैलास सानप साहेब,श्री शेंडगे साहेब,अतुल चव्हाण, श्री अभय करंजकर साहेब, उपस्थित होते
सर्वांचे आभार.

 


ही निवड झाल्याबद्दल चंपावती क्रीडा मंडळ बीड येथे सत्कार करताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.सर्जेराव(तात्या) तांदळे,काँग्रेस चे ज्येष्ठ नेते रवींद्र दळवी सर, उद्योजक दिनेश शेट मुंदडा, ईजी.धारूरकर सर,लोकमत टाइम्स चे पटेल सर,सेवानिवृत्त मेजर कुल्थे साहेब, इब्राहिम खान सर, मित्र कल्याण काशीद,विकास जेधे,अमर सानप,विशाल खाडे,अजिंक्य सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles