दोघांची हर्सुल कारागृहात रवानगी
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफियाचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बन्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सूचनेवरुन स.पोलीस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे पोलीस ठाणे तलवडा यांनी दिनांक 13/07/2023 व 14/07/2023 रोजी अनुक्रमे इसम नामे ) गोरख सदाशिव काळे वय 31 वर्षे 2) लखन तुकाराम काळे वय 38 वर्षे दोन्ही रा. राजापुर ता. गेवराई जि. बीड यांचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
गोरख सदाशिव काळे या स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे तलवडा येथे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दंगा करणे, रस्ता आडविणे, जबरी चोरी करणे, वाळु गौण खनिज याची चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, वगैरे अशा स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 06 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तसेच लखन तुकाराम काळे या स्थानबध्द इसमाविरुध्द एकुण 5 गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल असून त्यामध्ये रस्ता आडविणे, वाळु गौण खनिज याची चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, या व अशा स्वरुपाचे गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल आहेत. सदरील दोन्ही इसम हे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करून गोदावरी नदी पात्रातील वाळु गौण खनिज याची चोरी करुन साठा करुन चढया भावाने विक्री करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बन्याच दिवसांपासून करडी नजर होती. तसेच त्यांचेवर यापूर्वी CrPC 107,110 व कलम 56 मपोका प्रमाणे 02 वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर दोन्ही इसम हे प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने वाळु गौण खनिज चोरीचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवून होते. त्यांची तलवडा हद्दीत व गेवराई तालुक्यात दहशत आहे. त्यांचे विरुद्ध सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. ते शस्त्रासह फिरतात व सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना त्रास देवून दहशत निर्माण करुन वाळु चोरीचे गुन्हे करत होते.
सदर प्रकरणात श्रीमती. दिपा मुधोळ/मुंडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 26.07.2023 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसूल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबंध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2023/ आरबी डेस्क- 1/पोल-1/ एम.पी.डी.ए. 17 व 8 दिनांक 26.07.2023 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना स.पो.नि. तलवडा व श्री. संतोष साबळे पो. नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. यांनी संयुक्तरित्या गोपनिय खबऱ्याचे आधारे सदर स्थानबद्ध इसमास दि.26.07.2023 रोजी 20.05 वा. ताब्यात घेवून पोलीस ठाणे तलवडा येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हरसूल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 27.07.2023 रोजी 06.30 वा. हजर करून स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविपोअ गेवराई श्री. राजगुरु, पो.नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर वाघमोडे, पोउपनि भवर पोह सचिन आलगट, पोअं/ पिंपळे सर्व पो स्टे तलवडा तसेच स्थागुशा बीड येथील पोउपनि खटावकर, पोह अभिमन्यु औताडे, सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, विकास वाघमारे, घोडके, चालक कदम यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणान्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.