बीड स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पदी संतोष साबळे यांची नियुक्ती

बीड (प्रतिनिधी):येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले

स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी हा सतर्क व पदाला न्याय देणारा असला पाहिजे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी अनेकांनी लॉबिंग केल्याची चर्चा होते, त्यामुळे नियुक्ती कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोरी, दरोडा, घरफोडी यासह गुटखा, मटका अशा अवैध धंद्यांना आवर घालण्याचे साबळे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची तर जिल्हा वाहतूक शाखेला अशोक मुदिराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Latest Articles