बीड : (प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या विरुध्द गेवराई न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र तक्रारदार आणि कुटे यांच्यात शनिवारी आपसात तडजोड झाल्याने तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळवण्याचा मार्ग मोकळ झाला आहे.
याबाबत शनिवारी तक्रारदार योगेश मुंदडा यांनी सुरेश कुटे व आपली अपसात तडजोड झाल्याचे १०० रूपयाच्या बॉन्डवर नोटरी करून दिली आहे. आम्ही सोमवारी न्यायालयाकडे हे कागदपत्र सादर करणार आहोत.असे गेवराई पोलीस ठाण्यातून सांगितले आहे. ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे देण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून येत्या दोन दिवसांत तारेखेसह पैसे देण्याबाबत ठेवीदारांना माहिती देणार असल्याचे सांगून ठेवीदारांचा एकही रूपया ठेवणार नाही.त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता थोडे दिवस सहकार्य करून पाठीशी राहण्याचे आवाहन ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे यांनी केले आहे.